18 Marathi Actress to perform Dandiya for Vanshvel Marathi Movie
18 Marathi Actress to perform Dandiya for promotional Song of Vanshvel Marathi Movie.This is the first time that 18 leading marathi actress will be seen in marathi song.
स्त्री शक्तीचा जागर.
‘वंशवेल’ मधील प्रमोशनल गीतासाठी मराठीतील आघाडीच्या १८ अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र..
समाजात स्त्रियांवर होणाNया अत्याचारांविषयीच्या चर्चा झडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीला वंदन करत देवी अंबेमातेचा जागर करण्यासाठी 18 मराठी तारका एकत्र आल्या होत्या, निमित्त होते राजीव पाटील दिग्दर्शित ‘वंशवेल’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनल गीताचे. मराठी सिनेसृष्टीतील 18 अभिनेत्रींनी पहिल्यांदाच एकत्र येऊन देवीला साकडं घालत स्त्रीशक्तीचा प्रत्यय दिला. अर्चित फिल्मस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सुनील दामोदर मानकर यांची आहे.
चांदिवलीच्या स्टुडिओमध्ये ‘वंशवेल’ मधील या गाण्याचं चित्रीकरण नुकतच संपन्न झालं. यामध्ये स्मिता तांबे, अमृता खानविलकर, दिपाली सय्यद, क्रांती रेडकर ,मेघा घाडगे, नेहा पेंडसे, स्मिता शेवाळे,पूजा सावंत, सई लोकूर, तेजा देवकर, समीधा गुर, सिया पाटील, पूर्वा पवार, सोनाली खरे आणि ‘वंशवेल’ चित्रपटातल्या अभिनेत्री मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विदया करंजीकर व बालकलाकार जान्हवी मानकर या सगळ्यांनी एकत्र येत देवाचा जागर केला. गीतकार दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या
‘तूच दूर्गा तूच भवानी, संसाराची तू जननी..
सारी माया तूझी, अंबे कृपा करी..’
या गीताला संगीतकार अमितराज यांनी संगीत दिले असून आदर्श शिंदे यांनी हे गीत गायले आहे. नृत्यदिग्दर्शक विठ्ठल पाटील यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली या 18 अभिनेत्रींवर हे गीत चित्रीत करण्यात आले आहे. व कॅमेरामन विजय मिश्रा यांनी गीताचे छायाचित्रण केले.
या गाण्याची संकल्पना स्त्रियांना सन्मान देण्याविषयी आहे. नवरात्रीतच नव्हे तर इतर वेळीही स्त्रियांचा योग्य त-हेने मान सन्मान व्हावा हा मूळ हेतू हे गीता मागचा आहे. या सगळ्या अभिनेत्री देखील स्वत:चे अस्तित्व शोधण्यासाठी इथवर आल्या आहेत. या गाण्यातून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे.
सध्याची कुटुंबव्यवस्था आणि त्यातील ‘स्त्रि’चं महत्त्व यावर भाष्य करणारी ‘वंशवेल’ चित्रपटाची कथा संकल्पना दामोदर नारायण मानकर यांची असून कथा विस्तार आणि पटकथा राजीव पाटील आणि दत्ता पाटील यांनी लिहिली आहे. अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनू गंगावणे, मनिषा केळकर, नम्रता गायकवाड, विदया करंजीकर, उषा नाईक या कलाकारांच्या भूमिका असलेला ‘वंशवेल’ हा चित्रपट येत्या 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.
No comments:
Post a Comment