वृंदावन…
कविता.. चारोळ्या.. लेख..!!!
प्रत्येकाचं आयुष्य एक चित्रपट असतो..
प्रत्येकाचं आयुष्य एक चित्रपट असतो..
अन चित्रपटात मसाला भरलेला असतो..
ती नायिका असते.. अन तो नायक असतो..
सोबत सहनायिका.. अन एक खलनायकही असतो..
प्रत्येकजण काहीनाकाही भूमिका बजावत असतो..
प्रत्येकाचं आयुष्य एक चित्रपट असतो..!
एक गोष्ट सुरु.. अन दुसरीचा शेवट असतो..
एकदा उन्हाळा.. अन एकदा पावसाळा असतो..
प्रत्येकजण आपापलं गाणं गुणगुणत असतो..
प्रत्येकाचं आयुष्य एक चित्रपट असतो..!
कधी वळण लागते.. कधी गतकाळ असतो..
कुठे सवेंदना.. अन कुठे बोध असतो..
प्रत्येकजण मुखवटे घालून फिरत असतो..
प्रत्येकाचं आयुष्य एक चित्रपट असतो..!
निरोपाच्या क्षणी..
निरोपाच्या क्षणी
येई कंठ दाटुनी
पाऊले थाबकुनी
होई अंतकरण भारी..
सावरुनी अशावेळी
खोटं खोटं हसायचं
भावनांना थोपावूनी
मन घट्ट करायचं..
सुगंधित आठवणी
खोल हृदयी साठवत
निरोपाच्या क्षणी
भिजे शब्द आसवात..!
हरवलं आहे…
फुलांचा रन्ग.. हवेतला सुगन्ध..
निखळ आनंद.. हरवला आहे…
आशेची किरणे.. पोर्णिमेचे चांदणे..
मन्सोक्त हसणे.. हरवले आहे…
पावसाच्या धरा.. लाटांचा किनारा..
भावनांचा झरा.. हरवला आहे..
हे असं ते तसं.. सगळं आहे जसंच्या तसं…
तेव्हडं मन माझं कसं.. हरवलं आहे… !!!
डोळे तुझे..
डोळे तुझे.. आज इतके.. मोहक का दिसतात गडे..
डोळ्यात त्याचे.. प्रतिबिम्ब उमटले आहे.. म्हणून सखे..!
डोळे तुझे.. आज इतके.. टपोरे का दिसतात गडे..
डोळ्यात त्याची.. स्वप्न उमलली आहेत.. म्हणून सखे..!
डोळे तुझे.. आज इतके.. काळेभोर का दिसतात गडे..
डोळ्यात त्याची.. सावली पसरली आहे.. म्हणून सखे..!
डोळे तुझे.. आज इतके.. पाणिदार का दिसतात गडे..
डोळ्यात त्याच्या.. आठवणी दाटल्या आहेत.. म्हणून सखे..!
तुझे.. आज इतके.. सुंदर का दिसतात गडे..
डोळ्यात त्याचा.. विश्वास साठला आहे.. म्हणून सखे..!
क्षण…
क्षणात आपण कोणीतरी असतो
क्षणात आपण कोणीच नसतो…
क्षणात आपण कोणीच नसतो…
क्षणात क्षणाला अर्थ असतो
क्षणात क्षण निरर्थक असतो…
क्षणात क्षण निरर्थक असतो…
क्षणात श्वास मोकळा होतो
क्षणात श्वास कोंडला जातो…
क्षणात श्वास कोंडला जातो…
क्षणात क्षण क्षणिक ठरतो
क्षणात क्षण निरंतन होतो…!
क्षणात क्षण निरंतन होतो…!
आताशा मनास..
कधी उन्ह पावसात
कधी पाऊस उन्हात
आताशा मनास,
हे ऋतू कळेनात
कधी पाऊस उन्हात
आताशा मनास,
हे ऋतू कळेनात
कधी सत्य स्वप्नात
कधी स्वप्न सत्यात
आताशा मनास,
या स्थिती कळेनात
कधी स्वप्न सत्यात
आताशा मनास,
या स्थिती कळेनात
कधी जग शून्यात
कधी शुन्य जगात
आताशा मनास,
ही गणितं कळेनात
कधी शुन्य जगात
आताशा मनास,
ही गणितं कळेनात
कधी वाद प्रेमात
कधी प्रेम वादात
आताशा मनास,
हे भाव कळेनात!
कधी प्रेम वादात
आताशा मनास,
हे भाव कळेनात!
तो आणि ती…
तो अफाट गरजता सागर
ती त्यामधे सामावलेली निश्चल सरिता
ती त्यामधे सामावलेली निश्चल सरिता
तो उसळत्या लाटा
ती त्या लाटांचा किनारा
ती त्या लाटांचा किनारा
तो एक हिरवगार पान
ती त्यावर पडलेला सुंदर दवबिन्दु
ती त्यावर पडलेला सुंदर दवबिन्दु
तो विस्तीर्ण शाखा
ती त्यावर पसरलेला नाजूक वेल
ती त्यावर पसरलेला नाजूक वेल
ती एक कोमल फूल
तो त्यामधे गुंतलेला भूंगा
तो त्यामधे गुंतलेला भूंगा
तो एक शिंप्ला
ती त्यामधला टपोरा मोती
ती त्यामधला टपोरा मोती
तो एक शंख
ती त्यामधे लपलेली लाजाळु गोगालगाई
ती त्यामधे लपलेली लाजाळु गोगालगाई
तो एक मजबूत होडी
ती त्या होडीचे शीड
ती त्या होडीचे शीड
तो एक अटूत दगड
ती त्यामध्ये कोरलेले सुंदर शिल्प
ती त्यामध्ये कोरलेले सुंदर शिल्प
तो मुरलीधरची मुरली
ती त्या मुरलितुन उमटणारे मधुर सूर…!
ती त्या मुरलितुन उमटणारे मधुर सूर…!
नातं…
नातं नको हिमालयातल्या शुभ् बर्फासारखं,
सुंदर असलं तरी कालांतराने वितळून जाणारं…
नातं असावं ओबाड ढोबड दगडासारखं,
सगळ्या ऋतूंमधे अस्तित्व टिकून रहाणारं…!
सुंदर असलं तरी कालांतराने वितळून जाणारं…
नातं असावं ओबाड ढोबड दगडासारखं,
सगळ्या ऋतूंमधे अस्तित्व टिकून रहाणारं…!
नातं नको नदीच्या पात्रासारखा,
पाणी गोड असलं तरी त्याला मर्यादा असलेलं…
नातं असावं विशाल सागरसारखा,
खारं पाणी असला तर अथांग रूप असलेलं…!
पाणी गोड असलं तरी त्याला मर्यादा असलेलं…
नातं असावं विशाल सागरसारखा,
खारं पाणी असला तर अथांग रूप असलेलं…!
नातं नको एखाद्या विद्युत रोषणाई सारखं,
झगमगाट असलं तरी कृत्रिम भासणारं…
नातं असावं देवासमोरच्या समई सारखं,
छोट्या ज्योतिने मन प्रसन्न करणारं…!
झगमगाट असलं तरी कृत्रिम भासणारं…
नातं असावं देवासमोरच्या समई सारखं,
छोट्या ज्योतिने मन प्रसन्न करणारं…!
तुझ्या द्वारी…
तुझ्या द्वारी
दर्शनास यावे कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच प्रसन्न मुद्रा उमटावी…
दर्शनास यावे कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच प्रसन्न मुद्रा उमटावी…
तुझ्या द्वारी
घंटा वाजवावी कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच प्रेमळ साद उमटावी…
घंटा वाजवावी कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच प्रेमळ साद उमटावी…
तुझ्या द्वारी
नैवैद्य दाखवावा कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच मधुर चव उमटावी…
नैवैद्य दाखवावा कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच मधुर चव उमटावी…
तुझ्या द्वारी
प्रार्थना म्हणावी कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच करुण आर्तता उमटावी…
प्रार्थना म्हणावी कोणीही
अन् तुझ्या मनी
तीच करुण आर्तता उमटावी…
No comments:
Post a Comment