Wednesday, December 10, 2014



 | 

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे निधन

संत-योगी पुरुषांची चरित्रं लिहिणारे त्यासोबत लैंगिक विषयावरील कादंब-यांचेही बिनधास्त लेखन करणार ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी निधन झाले.
chandrakant khotमुंबई – स्वामी विवेकानंद, गजानन महाराज, साईबाबा यांसारख्या संत-योगी पुरुषांची चरित्रं लिहिणारे त्यासोबत लैंगिक विषयावरील कादंब-यांचेही बिनधास्त लेखन करणार ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील सातरस्त्यावरील साईबाबा मंदिरातच राहात होते.
उभयान्वयी अव्यय’, ‘विषयांतर’, ‘बिनधास्त या त्यांच्या कादंब-या विशेष गाजल्या.  ‘उभयान्वयी अव्यय’ या त्यांच्या कादंबरीने तर मराठी साहित्याचं व्याकरणच बदलून टाकलं. बिंब प्रतिबिंब’, दोन डोळे शेजारी’, ‘संन्याशाची सावली’ या कादंब-याही त्यांनी लिहिल्या. मराठी साहित्याला सोवळ्यातून बाहेर काढणारी जी काही बंडखोर नावं आहेत त्यातलं एक मुख्य नाव म्हणजे चंद्रकांत खोत. यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी भीमाशंकर येथे झाला.
१९६९ मध्ये चंद्रकांत खोत यांचा मर्तिक हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी कादंबरी लिखाणास सुरुवात केली. खोत यांनी यशोदा या मराठी चित्रपटासाठीही गीतलेखन केले होते. त्यासोबतच १९८४ साली त्यांचा ‘अबकडइ’चा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. त्याला वाचकांची मोठी पसंतीही मिळाली.यानंतर २१ वर्ष अंक प्रसिद्ध केले.
आणखी वाचा
चंद्रकात खोत यांची विशेष मुलाखत – सातरस्त्याचा हेमिंग्वे
Print Friendly
Tags:  | 

No comments:

Post a Comment