Tuesday, December 2, 2014

तो उगमस्थान नवचैतन्याचा..
तो झरा अखंड उत्साहाचा..
सडा पडतो जेव्हा त्याच्या सहवासाचा..
 वेल बहारतो माझ्या मनाचा..!!!
PUBLISHED IN:  ON ऑगस्ट 15, 2010 AT 4:58 सकाळी  प्रतिक्रिया नोंदवा  

आशेचा सुर्या मावळतो,
 तेव्हा इच्छाशक्तीच्या समईकडून प्रकाश मिळतो…!
समईतील तेल संपत येते,
 तेव्हा पुन्हा सूर्योदयची वेळ झालेली असते…!!!
PUBLISHED IN:  ON मार्च 27, 2010 AT 5:38 PM  प्रतिक्रिया नोंदवा  

तुझ्या आठवणींची कारंजी,
 मनात कायम फुलत राही..
भेटींचा दुष्काळ जरी,
 कारंज्यातले पाणी जराही आटत्त नाही…!
PUBLISHED IN:  ON मार्च 27, 2010 AT 5:32 PM  प्रतिक्रिया नोंदवा  

सैरभैर होऊन माझी वेडी नजर,
 शोधत होती तुला आजूबाजूच्या परिसरात…
थकून मिटले मी जेव्हा माझे नयन,
 सापडलस तू मज माझ्याच मनात…
PUBLISHED IN:  ON मार्च 27, 2010 AT 5:27 PM  COMMENTS (1)  

भेट नजरेची नजरेशी
शब्दात कशी वर्णनावी…
बोली नजरेची नजरेशी
अर्थात कशी मांडावी…!!!
PUBLISHED IN:  ON मार्च 27, 2010 AT 5:05 PM  COMMENTS (1)  

मी लिहिलं नाही तर..  कोणाला फरक पडतो?
मग मी का लिहावा?
मी लिहिलं तरी..  फरक कोणाला पडतो?
मग मी का लिहू नये???

No comments:

Post a Comment