अ. भा. मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये
पुढील वर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे.
पुणे- पुढील वर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवडय़ात हे संमेलन होईल, असे महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. घुमान ही संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची कर्मभूमी आहे.
साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे सर्वाधिक दहा निमंत्रणे आली होती. त्यामध्ये बडोदा आणि पंजाबमधील घुमान यासह राज्यातील आठ ठिकाणांचा समावेश होता. त्यापैकी बडोदा, घुमान आणि उस्मानाबाद यांसह पाच ठिकाणांना साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीतील सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली होती. स्थळ निवड समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत त्यावर चर्चा झाली आणि घुमान येथे संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. घुमानमध्ये संमेलन भरविण्यासाठी निमंत्रक म्हणून भारत देसरडा आणि संयोजक म्हणून ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्याकडून निमंत्रण आले असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमानमध्ये मराठी साहित्याचा आवाज दुमदुमणार आहे.
संत नामदेवांनी मराठीचा प्रसार पंजाबमध्ये केला आणि पंजाबी लोकांना नामदेव व मराठी भाषा आपली वाटायला लागली. याची आठवण करून देत मराठी समाजालाही घुमान आपले वाटायला लागेल, अशी आशा निमंत्रक संजय नहार यांनी व्यक्त केली.
शीखांमध्ये मूर्तीपूजा व्यर्ज असली तरी काही सन्माननीय अपवादांमध्ये नामदेवांचा समावेश आहे. फतेहगड साहिबजवळच्या बास्सी पाथना या शहरामध्ये संत नामदेव मंदिर असून त्यात नामदेवांची मूर्ती आहे. संत ज्ञानदेवांकडून प्रेरणा घेतलेल्या नामदेवांनी भक्तीमार्गासाठी स्वत:ला झोकून दिले आणि विठ्ठलभक्तीत ते बुडून गेले. तेराव्या शतकाच्या शेवटी शेवटी ते महाराष्ट्रातून देशभ्रमणासाठी बाहेर पडले. पंजाबमधील घुमान या गावाची स्थापनाच संत नामदेवांनी केली, जिथे त्यांनी ध्यानधारणेत १७ वर्षे व्यतित केली. नामदेवांचा पंजाबी जीवनावर इतका प्रभाव होता की पुढे शीखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरूग्रंथसाहिबमध्ये संत नामदेवांच्या ६१ श्लोकांचा समावेश करण्यात आला. ज्यांना ‘नामदेवबानी’ किंवा ‘नामदेव वाणी’ असे संबोधतात. आजही नामदेवांनी वसवलेले गाव म्हणून घुमानची ओळख आहे. याच घुमानमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असा येथील लोकांचा विश्वास आहे. त्यांच्या या कर्मभूमीत साहित्य संमेलन होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
विश्व मराठी साहित्य संमेलन दक्षिण आफ्रिकेत
विश्व मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे भरविण्यात येईल, अशी माहिती वैद्य यांनी दिली.
फतेहगड साहिबजवळच्या बास्सी पाथना या शहरामध्ये संत नामदेव मंदिर असून त्यात नामदेवांची मूर्ती आहे. संत ज्ञानदेवांकडून प्रेरणा घेतलेल्या नामदेवांनी भक्तीमार्गासाठी स्वत:ला झोकून दिले आणि विठ्ठलभक्तीत ते बुडून गेले. तेराव्या शतकाच्या शेवटी शेवटी ते महाराष्ट्रातून देशभ्रमणासाठी बाहेर पडले. पंजाबमधील घुमान या गावाची स्थापनाच संत नामदेवांनी केली, जिथे त्यांनी ध्यानधारणेत १७ वष्रे व्यतित केली. नामदेवांचा पंजाबी जीवनावर इतका प्रभाव होता की पुढे शीखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरूग्रंथसाहिबमध्ये संत नामदेवांच्या ६१ श्लोकांचा समावेश करण्यात आला.
ज्यांना ‘नामदेवबानी’ किंवा ‘नामदेव वाणी’ असे संबोधतात. आजही नामदेवांनी वसवलेले गाव म्हणून घुमानची ओळख आहे. याच घुमानमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असा येथील लोकांचा विश्वास आहे. त्यांच्या या कर्मभूमीत साहित्य संमेलन होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व आहे.
No comments:
Post a Comment